Chandani-Chowk sakal
पुणे

Chandani Chowk : चांदणी चौकाने प्रवाशांना आणले ‘रस्त्यावर’; पादचारी मार्गाअभावी जीव धोक्यात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च करून चांदणी चौकात उड्डाण पूल बांधला, या उड्डाण पुलाचे उद्‌घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

प्रशांत पाटील

मयूर कॅालनी - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च करून चांदणी चौकात उड्डाण पूल बांधला, या उड्डाण पुलाचे उद्‌घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले. उड्डाण पुलाची कित्येक कामे अपूर्ण असताना उद्‌घाटन घाईघाईने केल्याचा आरोप त्या वेळी झाला होता.

तो आरोप खरा ठरावा अशीच परिस्थिती सध्या चांदणी चौकात दिसून येत आहे. या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी मार्गच केला नसल्याने दररोज हजारो प्रवाशांना स्वत:चा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

चांदणी चौकातून मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या मार्गावर वाहनांना प्रचंड वेग असतो. अवजड वाहनेदेखील याच मार्गावर धावत असतात. या चौकातून सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबईला नियमित जाणारे व येणारे हजारो प्रवासी आहेत.

मुंबईच्या दिशेने आलेले प्रवासी कोथरूडच्या बाजूला उतरल्यावर त्यांना एनडीए, भूगाव, मुळशीकडे जाण्यासाठी किंवा एनडीएकडून कोथरूड, बावधनकडे पायी जाण्यासाठी पादचारी मार्गच बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात.

रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी मार्ग नसल्याने दुभाजकावरून जावे लागते. भरधाव वाहनांच्या गर्दीतून स्वत:चा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. लहान मुलं असणाऱ्या महिलांचे खूप हाल होतात. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी रिक्षा केल्याशिवाय पर्याय राहत नाही. या ठिकाणी तत्काळ पादचारी मार्ग करायला हवा.

- सुप्रिया जाधव, प्रवासी

पादचाऱ्यांच्या सोईसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) बांधला जाणार आहे. काल झालेल्या बैठकीत मी सांगितले आहे. तसेच पत्र देखील देणार आहे.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

दहा महिने उलटूनही विचार नाही

उड्डाण पुलाचे उद्‌घाटन होऊन दहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापि पादचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. चौकातील रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, अपंग नागरिकांसाठी कोणतीही सोय न केल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या विरोधात ‘सकाळ’कडे संताप व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन चौकात तत्काळ पादचारी मार्ग उभा करावा, अशी मागणीदेखील पादचाऱ्यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांकडून मिळेना प्रतिसाद

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना मंगळवार (ता. ९) आठ ते दहा वेळा संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

तीन किमीसाठी १२० रुपयांची मागणी

महामार्ग ओलांडून विरुद्ध दिशेला जायचे असेल, तर रिक्षा करून दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. मध्यरात्री चौकात आल्यावर विरुद्ध दिशेला जायचे असेल, तर रिक्षादेखील उपलब्ध नसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना तीन किलोमीटर चालत जावे लागते. तीन किलोमीटर जाण्यासाठी रिक्षाचालक तब्बल १२० रुपये मागतात. मंगळवारी (ता. ९) ‘सकाळ’ने पाहणी केली असता, महामार्गाच्या दुभाजकावर लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरू होते. तर रस्ता ओलांडण्यासाठी जाळीच्या बाजूने प्रवासी चालत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT