Pune Chandani Chowk Video Sakal
पुणे

Pune Chandani Chowk : चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण! पाहा भव्यदिव्य पुलाचा ड्रोन Video

Pune Chandani Chowk Video: पुणे शहरातील बहुचर्चित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे.

दत्ता लवांडे

Pune Chandani Chowk: पुणे शहरातील बहुचर्चित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. या पुलाचे भव्य दिव्य रूपाचे ड्रोन फुटेज आता समोर आले आहेत.

दरम्यान, चांदणी चौकातून दररोज दीड लाख नागरिक प्रवास करत असतात. येथील जुना पूल १९९२ साली राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आला होता. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी पाहता जुना पूल पाडून नवा पूल बांधण्याची योजना आखण्यात आली होती.

त्यानंतर हा पूल पाडण्याची घटनासुद्धा चांगलीच चर्चेत राहिली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये हा पूल पाडण्यात आला होता. त्यानंतर या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चांदणी चौकातील पुलाचे भव्य दिव्य रूप ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शूट केले आहे. तर हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. अजूनही चांदणी चौकात वाहतूक कोंडी होत असल्याचं नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT