Girish Bapat 
पुणे

काम तातडीने करण्याची बापट यांची सूचना

सकाळवृत्तसेवा

पुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पुणे महानगरपालिकेला दिल्या. 

जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पालकमंत्री बापट आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह महानगरपालिका व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत चांदणी चौक उड्डाण पूल, पुरंदर विमानतळ, पीएमआरडीएला अर्धा टीएमसी पाणी देण्यासंदर्भात, भामा आसखेड, मेट्रो आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी चांदणी चौक येथील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले. भूसंपादनासाठी सुमारे ६०० नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली. या प्रकल्पग्रस्तांनी जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी करण्यात आली आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन देणे शक्‍य नसेल, तर रोख स्वरूपात मोबदला देण्यात यावा; तसेच यासाठी पुणे आणि पिंपरी पालिकांनी पैसे द्यावे, अशी सूचना बापट यांनी या वेळी दिल्या.

पाणीप्रश्‍नाबाबत आज बैठक
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांना खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी होत आहे. पीएमआरडीएकडून अर्धा टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी उद्या (ता. २६) मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बैठक होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT