Chandani Chowk sakal
पुणे

चांदणी चौकातील पूल पाडला पण बॉटलनेक कायम

चांदणी चौकातील एनडीए पाषाण पूल पाडला असला तरीही मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाताना झिनिया सोसायटीपासून पुढे स्ता रुंदीकरण रखडलेले आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

चांदणी चौकातील एनडीए पाषाण पूल पाडला असला तरीही मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाताना झिनिया सोसायटीपासून पुढे स्ता रुंदीकरण रखडलेले आहे.

पुणे - चांदणी चौकातील एनडीए पाषाण पूल पाडला असला तरीही मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाताना झिनिया सोसायटीपासून पुढे स्ता रुंदीकरण रखडलेले आहे. महापालिकेने या ठिकाणचे भूसंपादन पूर्ण करून ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) हस्तांतरित केली. पण एनएचएआयने काम सुरु न केल्याने सहा पदरी (लेन) असलेला महामार्ग सोसायटीपासून पुढे केवळ दोन पदरीच होतो. त्यामुळे मोठा गाजावाजा करून चौकातील पूल पाडला असला तरी साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील बॉटलनेक कायम आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून ‘एनएचएआय’कडून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजेच गेल्याच आठवड्यात येण्याची एनएचएआयने ‘एनडीए पाषाण’ यांना जोडणारा महामार्गावरील पूल स्फोट करून पाडून टाकला. या ठिकाणी आता उर्वरित खडक फोडून रस्ता मोठा करण्याचे काम सुरू आहे. हा खडक फोडल्यानंतर अतिरिक्त दोन लेन उपलब्ध होतील, त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी सुटेल असा दावा एनएचएआय व वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही केला आहे. पण पूल पाडल्यानंतरही या चौकातील वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे.

चांदणी चौकात अतिरिक्त दोन लेन उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना होणार आहे. पण मुंबई कडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या प्रवासातील अडथळे अद्याप कायम आहेत. साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर मुळशीकडून येणारा उड्डाणपूल उतरवण्यात आला आहे. त्यामुळे येथील महामार्गाची रुंदी कमी झाली असून, केवळ दोन ते अडीच लेन वाहनांसाठी उपलब्ध आहेत. तसेच झिनिया सोसायटी पासून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुमारे २०० मीटरच्या रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही. एकीकडे उड्डाणपुलामुळे महामार्गाची रुंदी कमी झालेली आहे व दुसरीकडे येथे सर्व्हिस रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे झिनिया सोसायटीच्या समोर बॉटलनेक झालेला असल्याने गर्दीच्या वेळेला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी झिनिया सोसायटीपासून पुढे सर्व्हिस रस्ता होणे आवश्‍यक आहे. पण त्यासाठी अद्याप ‘एनएचएआय’ने काम सुरू केले नाही. सध्या या ठिकाणी मोठा खड्डा खोदलेला आहे, पण मोठ्या प्रमाणात पडलेला राडारोडा, खोलगट भाग, तेथील झाडे यामुळे तेथे रस्ता अस्तित्वातच नाही. हे काम करण्यासाठी किमान दोन ते अडीच महिने लागू शकतात.

खोलगट भागामुळे बांधावा लागणार छोटा पूल

झिनिया सोसायटी ते मुळशीकडून येणारा उड्डाणपूल संपतो तिथपर्यंत डाव्या बाजूने सुमारे १२ मीटरचा सर्व्हिस रस्ता केला जाणार आहे. त्या ठिकाणी सध्या खोलगट भाग आहे व त्यास लागून बंगले आहेत, त्यामुळे तेथे भराव टाकणे शक्य नसल्याने या खोलगट भाता पिलर टाकून छोटा पूल बांधला जाईल व त्यावरून सर्व्हिस रस्ता केला करण्याचे नियोजन असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘मुंबई ते सातारा या दिशेने जाणाऱ्या महामार्गाच्या लगत आवश्‍यक असलेले भूसंपादन १०० टक्के पूर्ण करून. ही जागा एनएचएआयला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे तेथे काम करणे शक्य आहे. या प्रकल्पात सध्या वेदभवन व मुळशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीचे भुसंपादनासंदर्भात न्यायालयात याचिका आहेत म्हणून ते पूर्ण झालेले नाही.’

- प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन विभाग, महापालिका

  • चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाचा खर्च - ३९७ कोटी

  • महापालिकेने भूसंपादनासाठी केलेला खर्च - २७५ कोटी

  • ताब्यात घेतलेली जागा - १७.१७ हेक्टर

  • न्यायालयीन प्रकरण - २ (१९६५ चौरस मीटर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT