Chandni Chowk in Pune will be closed for traffic from April 10 Know alternative routes  
पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! चांदणी चौकातील वाहतूक 10 एप्रिलपासून राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

रोहित कणसे

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील नवीन उड्डाण पुलाचे उद्घाटन येत्या १ मे रोजी होणार आहे. या पुलाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून येथे १५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

चांदणी चौकातील हे काम दोन दिवस चालणार असून त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून या काळासाठी हा पर्यायी रस्ता उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

१० एप्रिलला चांदणी चौकातील सर्विस रोड सुरू होणार आहे, त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात येईल. यासंबंधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

हे असतील पर्यायी मार्ग

मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे 'एनएचएआय'कडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT