मंचर, ता. २४ : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे दहशत निर्माण करणाऱ्या दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. येथे शुक्रवारी (ता. २३) रात्री आणि शनिवारी (ता. २४) सकाळी शेजारी-शेजारी लावलेल्या दोन पिंजऱ्यांत दोन बिबटे अडकले आहेत. असे असले तरी तिसऱ्या बिबट्याची दहशत कायम असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
चांडोली खुर्द गावच्या हद्दीत तीन बिबटे एकत्र फिरताना ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यामुळे शेतातील कामावर मोठा परिणाम झाला होता. विद्यार्थी भयभीत झाले होते. किरण इंदोरे यांच्या पोल्ट्रीशेजारील शेतात बुधवारी (ता. २१) पिंजरा लावला होता. शुक्रवारी रात्री पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी दुसराही बिबट्या दुसऱ्या लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. पकडलेला बिबट्या मादी असून तिचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सोनल भालेराव यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वनरक्षक पी. ए. कासुळे, वनसेवक जालिंदर थोरात आणि किसन पोखरकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले. परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याची शक्यता असल्याने त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चांडोली खुर्द परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांनी सायंकाळी व रात्री एकट्याने बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, रात्री अंगणात झोपू नये. शेतात जाताना टॉर्च व काठी सोबत ठेवावी.
- सोनल भालेराव, वनपाल
16887
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.