TVS26A00050
तावशी ः परिसरातील माण नदीचे कोरडे पडलेले पात्र.
चंद्रभागेला पूर; मान नदीचे पात्र मात्र कोरडेच
एकाच जिल्ह्यात पूर आणि पाणीटंचाईचे चित्र
सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. ५ : उजनी धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या चंद्रभागेचे हे भरलेले रूप दिलासादायक असले, तरी दुसरीकडे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीचे पात्र अद्याप कोरडे असल्याचे वास्तव आहे.
एका बाजूला चंद्रभागेतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असताना दुसऱ्या बाजूला माण नदीत पाण्याचा थेंबही नसल्याने सिंचन, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे उपलब्ध जलसंपत्तीचे नियोजन योग्य पद्धतीने होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माण नदी खोऱ्यातील अनेक गावांतील शेतकरी पावसावरच अवलंबून असल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. नदीत पाणी नसल्यामुळे विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही घटली असून, पुढील काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.