चंद्रहार गोडसे यांना उत्कृष्ट सेवा पदक
कोडोली, ता. २० : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस दलातील दीर्घकाळ गुणवत्तापूर्ण व निष्कलंक सेवेसाठी दिले जाणारे उत्कृष्ट सेवा पदक ठाणे शहर येथे कार्यरत वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रहार मानसिंग गोडसे यांना प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्टला त्यांचा गौरव करण्यात आला.
श्री. गोडसे हे २००८ पासून गेली १८ वर्षे पोलिस दलात कार्यरत आहेत. नागपूर, नवी मुंबई व ठाणे येथे त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत कर्तव्य बजावले आहे. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्यांनी पोलिस सेवेत उल्लेखनीय मजल गाठली. ते मूळचे डोळेगाव (ता. सातारा) येथील असून, सध्या सातारा येथे स्थायिक आहेत. सध्या ते ठाणे शहरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
W43579
सातारा ः सेवा पदक स्वीकारताना चंद्रहार गोडसे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.