पुणे

प्राचार्य चंद्रकांत ढोलेंना सेवापूर्ती कार्यक्रमात मिळाली संस्थेच्या सीईओ पदी नियुक्ती

CD

ANR26B02862
अनगर (ता. मोहोळ) : प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त सन्मानपत्र देऊन सन्मान करताना राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, मारुती फडके, ओमप्रकाश जोगदे आदी.
..........
प्राचार्य ढोलेंची सेवापूर्ती कार्यक्रमात संस्थेच्या सीईओपदी नियुक्ती
.........
अनगर, ता. १ : येथील (कै.) शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत ढोले हे नियत वयोमानानुसार ३१ जानेवारीला सेवानिवृत झाले सेवापूर्ती कार्यक्रमातच संस्थेचे मार्गदर्शक सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी त्यांची संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपविली. मुख्याध्यापक म्हणून ते 33 वर्ष सात महिने 21 दिवस एवढी प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झाले.
प्रारंभी लोकनेते (स्व) बाबूराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. शिक्षण प्रवाहातील आनंदयात्री या श्री ढोले यांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले व यावेळी त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सपत्नीक सेवापूर्तीचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे उपस्थित होते. कार्यक्रमात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले की, ढोले यांनी अतिशय निष्ठेने व समर्पित भावनेने काम केले आहे. ते एक उत्तम प्रशासक असून त्यांच्या या गुणवत्तेचा संस्थेने पुढील काळातही उपयोग करून घ्यावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी पुणे परीक्षा परिषदेचे उपायुक्त मारुती फडके यांनीही ढोले यांचा सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार राजन पाटील म्हणाले, की अवघ्या २७ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज २३१५ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. शाळेच्या व संस्थेच्या विस्तारात प्राचार्य ढोले सरांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या अंगी असलेली संस्थेप्रती निष्ठा व कामावरील श्रद्धा लक्षात घेऊन त्यांची संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी नियुक्तीचे अधिकृत पत्र ढोले सरांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी लोकनेते साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, माजी प्राचार्य रंगसिद्ध दसाडे, माजी प्राचार्य भिकाजी कुलकर्णी, प्राचार्य सुधीर गायकवाड, प्राचार्य बशीर बागवान, प्राचार्य संजय करंडे, माजी मुख्याध्यापक विश्वजीत लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT