पुणे

कास - शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी दगडू दादा रूग्णालयात...

CD

साताऱ्यात येताच दगडू सपकाळ रुग्‍णालयात

शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्‍या तब्येतीची विचारपूस करून कामास सुरुवात

कास, ता. १९ : साताऱ्यात माजी आमदार दगडू सकपाळ यांनी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांची सर्वप्रथम रुग्‍णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली. त्‍यानंतर कामकाजाला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिवसेनेची हीच शिकवण यानिमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर आली.
शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते माजी आमदार दगडू सकपाळ हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आजपासून सातारा दौऱ्यावर आले आहेत. साताऱ्यात विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांनी व शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. विश्रामगृहातील आपल्या कक्षात जाऊन त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय केला. त्यावेळी त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव हे आजारपणामुळे रुग्णालयात असल्याचे समजले. कोल्हापूर, सांगली, सातारा येथून पदाधिकारी भेटायला आल्याने दगडू सपकाळ यांनी कामकाजाला सुरुवात केली खरी; पण त्यांचे लक्ष कामकाजाकडे लागेना. शेवटी ते जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांना म्हणाले, ‘‘आपण चंद्रकांतला पहिले बघून येऊ. त्याशिवाय माझे कामात लक्ष लागणार नाही.’’ दगडू सपकाळ बैठक सोडून तातडीने रुग्णालयात गेले व जाधव यांच्या तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरांकडून तब्येतीबाबत माहिती घेतली. सामान्य शिवसेना कार्यकर्ता असो वा पदाधिकारी, तो आजारी आहे म्हटल्यावर शिवसेनेचे नेते त्याला बघायला जाणारच, हेच शिवसेनेचे वेगळेपण यानिमित्ताने जनतेसमोर आले आहे.
..........................................
शिवसेना आणि इतर पक्षात हे वेगळेपण आहे. पक्षाचा कार्यकर्ता अथवा पदाधिकारी आजारी आहे म्हटल्‍यावर नेते सुद्धा पहिले प्राधान्य देऊन आपल्या पद्धतीने भेटणे पसंत करतात. ही प्रेमाची, आपुलकीची वागणूक दुसऱ्या कोणत्या पक्षात पाहायला मिळत नाही. म्हणूनच एक वेळ शिवसैनिक झालेला कार्यकर्ता शिवसेना कधीही सोडत नाही.
- चंद्रकांत जाधव,
जिल्हाप्रमुख शिवसेना
.........................................
फोटो :........04596
सातारा : रुग्णालयात जाऊन चंद्रकांत जाधव यांच्‍या तब्येतीची विचारपूस करताना दगडू सपकाळ.
............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT