Chandrakant Patil Convoy Accident  sakal
पुणे

Chandrakant Patil Convoy Accident : मध्यरात्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला कोणी धडक दिली ? पुण्यात नेमकं काय घडलं

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मोटारीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास जबर धडक बसली.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मोटारीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास जबर धडक बसली. या घटनेत एका सुरक्षा अधिकाराऱ्याला मुकामार बसला आहे.

धडक देणाऱ्या मोटारीत दोन युवक आणि तीन युवती होत्या. त्यांनी मद्यपान केले होते, असा पोलिसांचा संशय आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दिवसभर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत पाटील मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घरी परतत होते. कोथरूडमध्ये आशिष गार्डन चौकातून त्यांचा ताफा महात्मा सोसायटीच्या दिशेने वळाला.

त्यावेळी एका भरधाव मोटारीने पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, धडक देणाऱ्या मोटारीचे बॉनेट हवेत उडाले आणि त्यातील एअर बॅग्ज बाहेर आल्या.

पाटील बसलेल्या मोटारीत मागच्या बाजूला असलेल्या मोटारीला ही धडक बसली. त्यानंतर पाटील यांनी ताफा तत्काळ थांबविला. खाली उतरून त्यांनी चौकशी केली. दरम्यान ताफ्यातील अन्य पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव पाटील यांना महात्मा सोसायटीतील निवासस्थानी रवाना केले.

या घटनेबाबतची माहिती पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. धडक देणाऱ्या मोटारीत दोन युवक आणि तीन युवती होत्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. पाटील म्हणाले, ‘‘ताफ्यात मी बसलेल्या मोटारीत मागच्याच बाजूला मोटार होती. काही क्षणांमुळे मी बचावलो.

माझे दैव बलवत्तर होते. रस्ता रिकामा असल्यामुळे ती धडक देणारी मोटार भरधाव होती. एका सुरक्षा अधिकाऱ्याला थोडा मुकामार बसला आहे. त्यांची मोटार शासकीय होती. तिचे जबर नुकसान झाले आहे. या बाबत कोथरूड पोलिस तपास करीत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT