पुणे

चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीवर केला 'इतका' खर्च

अनिल सावळे

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची निवडणुकीतील खर्चाची रक्‍कम ऐकून विश्‍वास बसणार नाही. दैनंदिन हिशेबाच्या नोंदीनुसार त्यांनी खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख 57 हजार 289 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. परंतु कोथरूडमधील ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. निवडणुकीत उमेदवाराच्या निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशेबांच्या नोंदी केल्या जातात. या नोंदवहीतील खर्च निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीकडे सादर केला जातो. पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधींनी हा तपशील आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार 13 ऑक्‍टोबरला शिवाजी पुतळा ते आशिष गार्डनपर्यंत काढण्यात आलेल्या रॅली आणि जाहीर सभेवर एक लाख आठ हजार 154 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.

रॅलीसाठी हलगी, ध्वनिक्षेपक, रिक्षा, प्रचारासाठी वाहन, उमेदवाराच्या वाहनाचा इंधन खर्च आणि छायाचित्रणावरील खर्च झाला आहे. तसेच, जाहीर सभेच्या स्टेजसाठी 48 हजार रुपये, खुर्च्यांवर 16 हजार रुपये, एलईडी स्क्रीन आणि साऊंड सिस्टीमवर 18 हजार रुपये खर्च झाले आहेत. टी-शर्टवर 23 हजार रुपये तर सोशल मीडियासाठी 19 हजार 589 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

या मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे होते. त्यांनी निवडणुकीत नऊ लाख 27 हजार 727 रुपये खर्च झाल्याचे दाखवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : रस्त्यांतील खड्ड्यांमुळे लोक मरत आहेत, प्रशासनाला सोयरसुतक नाही- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT