chandrakant patil esakal
पुणे

मला माजी मंत्री म्हणू नका, 3 दिवसांत कळेल - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांचा उल्लेख सतत माजी मंत्री असा केला जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसात कळेल असं सांगितलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

देहुतील एका कार्यक्रमात मंचावर व्यक्तीने सतत माजी मंत्री असा उल्लेख केला. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एका दुकानाचे उद्घाटन झाले. त्यावेळी माइकवरून सूत्रसंचालन करणारी व्यक्ती सातत्यानं माजी मंत्री असा उळ्लेख करत होती. तेव्हा मधेच चंद्रकांत पाटील यांनी त्या व्यक्तीला थांबवत मला माजी मंत्री म्हणू नका असं सांगितलं.

राज्याच्या राजकारणा पुन्हा भूकंप होणार का अशी चर्चा आता रंगली आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखामध्ये संभाजी ब्रिगेड आणि भाजपच्या युतीचा पर्यायाबद्दल विधान केल्यानं आधीच राज्यात त्याबद्दल चर्चा सुरु आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण पहायला मिळणार का याची चर्चा होत असताना चंद्रकांत पाटील यांच्या मला माजी मंत्री म्हणू नका या वक्तव्यानं राज्यात आणखी काय होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

पुरुषोत्तम खेडेकरांच्या युतीबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या मुखपत्रात अशी इच्छा व्यक्त केलीय. मात्र भाजपकडून असा काही निर्णय नाही. तसंच त्यांना बोलायचे असेल किंवा काय ऑफर आहे ते आमच्यापर्यंत आलेलं नाही. त्यांची ऑफर काय आहे पाहून चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT