Chandrakant Patil-Nawab Malik sakal
पुणे

"रोज तोंडाची वाफ का दवडता? परिणाम भोगावे लागतील" - पाटील

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः राज्यात शेतकरी प्रश्‍न, महिला अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. या वादात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओढले आहे, याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत टीका केली. यावेळी भाजपचे प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यात महापूर येऊन मराठवाड्यातील ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप चालू आहे आणि २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण अशा विषयांवर राज्य सरकार काहीच बोलत नाही.

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. पण वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. पण तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी. पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता?, अशी टीकाही पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT