Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Election  Esakal
पुणे

Kasba Bypoll Election : राजकारणात खळबळ उडवणाऱ्या फडणवीसांच्या 'त्या' 7 तासांच्या बैठकीत काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून या राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने उडी घेतल्यामुळे या दोन्ही निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचं दिसून येत आहे. तर या दोन्ही निवडणुकांचा प्रचार सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत.

एकीकडे पुण्यात प्रचाराचा धुरळा उडत असतानाच दुसरीकडे भाजपची कल रात्री एक महत्वाची बैठक पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीस चार मंत्री उपस्थित राहिले होते. तब्बल सात तास ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुण्यातील विविध महत्वाच्या घटकातील प्रमुख लोकांची उपस्थिती दिसून आली आहे.

फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल झालेल्या बैठकीत कुणीही उद्योजक नव्हते. मी देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीचे मेंबर होतो. बैठकीत निवडणुकीचे विश्लेषण झाले. औपचारिक बैठक होती यात देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असं त्यांनी म्हंटलं आहे.

तर भाजप प्रत्येक निवडणुकीत ताकद लावते हे तुम्हाला नवीन वाटत असेल. जेव्हा निवडणूक असते तेव्हा ती पक्षासाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता जे करतो तेच या निवडणुकीत करत आहे वेगळं काहीच नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.

तर कालच्या 7 तासाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील मोठा व्यापारी वर्ग आहे. त्यांच्यासोबत फडणवीस यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. ही भेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाकारली आहे. या बैठकीत कोणीही उद्योजक नव्हते असं ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT