Sharad Pawar and Chandu Borde Sakal
पुणे

टीम इंडियाच्या व्यवस्थापक पदासाठी बोर्डेंना पहिली पसंती; शरद पवार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी कार्यरत असताना भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीत कधीच हस्तक्षेप केला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी कार्यरत असताना भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीत कधीच हस्तक्षेप केला नाही. या संघात कोण असावे, यासाठीही कधी आग्रह धरला नाही. पण भारतीय क्रिकेट संघाच्या (टीम इंडियाच्या) व्यवस्थापकपदी चंदू बोर्डे हेच असले पाहिजेत, ही इच्छा होती. त्यामुळे या पदासाठी बोर्डे यांनाच पहिली पसंती देत, त्यांची या पदावर नियुक्ती केल्याची आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२१) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितली.

पुण्यातील एका खासगी कंपनीने भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. या समारंभात शरद पवार यांच्या हस्ते आज (ता.२१) चंदू बोर्डे यांना एक लाख रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ क्रिडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी उपस्थित होते. या सत्कारप्रसंगी द्वारकानाथ संझगिरी यांनी चंदू बोर्डे यांची प्रकट मुलाखत घेतली.

पवार म्हणाले, ‘खेळ कोणताही असो. त्या त्या खेळाचे मैदान गाजविणे हे खेळाडूचे काम असते आणि खेळाचा प्रसार करणे, खेळासाठी सुविधा निर्माण करणे हे संघटकाचे काम असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष (बीसीसीआय) असताना या सूत्राचा कायम अवलंब केला. त्यामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी कधीच ‘टीम इंडिया’च्या संघ निवडीमध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा अमक्या खेळाडूचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करा, अशी शिफारसही केली नाही. परंतु संघाच्या व्यवस्थापकपदाच्या नियुक्तीचा प्रश्‍न आल्यानंतर मी चंदू बोर्डे यांच्या नावाला पहिली पसंती दिली. बोर्डे हे एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होते. ते महाराष्ट्राची शान आहेत.’’

... तर पुन्हा बॅटिंग करावी वाटते - चंदू बोर्डे

माझे वय आता ८७ वर्षे झाले आहे. या वयात होत असलेल्या सत्काराने भारावून गेलो आहे. अशा सत्कारामुळे मनाला आणि शरीराला नवी ऊर्जा मिळते आणि पुन्हा बॅटिंग करावी वाटते, अशी प्रतिक्रिया माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी या सत्कार समारंभात बोलताना दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माझ्या सन्मानाची हॅट्ट्रिक झाली आहे, अशी आठवणही बोर्डे यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Mumbai Heavy Rain : अंधेरीत ४ फूट पाणी, सबवे ३ तासांपासून बंद; गटाराचं झाकण तुटलं, पावसाने नागरिकांचे हाल

Dmart Thefts: खरेदी कमी, चोरी जास्त, डीमार्टमध्ये सर्वात जास्त चोरी कोणत्या वस्तूंची होते?

Video: 'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटने पुन्हा दिला 'तो' सीन; अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Updates : आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा- मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT