pune traffic sakal
पुणे

Pune Traffic : 'पुणे बंद'मुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मंगळवारी (ता.13) बंद पुकारण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मंगळवारी (ता.13) बंद पुकारण्यात आला आहे.

पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मंगळवारी (ता.13) बंद पुकारण्यात आला आहे. त्यानिमित्त पक्ष व संघटनांकडून मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभुमीवर मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या मोर्चाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथुन सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा टिळक चौकातुन लक्ष्मी रस्त्यावरुन उलट दिशेने बेलबाग चौक, डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जाऊन जिजामाता चौक येथील लाल महाल चौकात येणार आहे. तेथेच या मोर्चाचा समारोप होणार आहे. त्यामुळे डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना या भागातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मोर्चाच्या कालावधीत संबंधित मार्गावरील वाहतुक परिस्थिती पाहून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी टिळक रस्ता, केळकर रस्ता व कुमठेकर रस्त्याचा वापर करुन इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी केले आहे.

मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आवश्‍यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते

* लक्ष्मी रस्ता - सोन्या मारुती चौक ते टिळक चौक

* छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - स.गो.बर्वे चौक ते बेलबाग चौक

* बाजीराव रस्ता - पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक

* गणेश रस्ता - फडके हौद चौक ते जिजामाता चौक

* केळकर रस्ता - अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक

पर्यायी मार्ग

नेहरु रस्त्यावरील नरपतगिरी चौकातुन 15 ऑगस्ट चौकाकडे, पॉवर हाऊस चौकातुन केईएम रुग्णालयाकडे, संत कबीर चौकातुन लक्ष्मी रस्त्याने पुढे. पीएमपीएल बसची वाहतुक आवश्‍यकतेप्रमाणे सेव्हन लव्हज हॉटेलजवळील चौक ते मालधक्का चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Agrawal: कोण आहेत राजेश अग्रवाल? राज्याचे मुख्य सचिव म्हणून घेणार पदभार

Maharashtra Politics: जो ठाकरेंसोबत गेला, तो भुईसपाट झाला; मंत्री आशीष शेलार यांचा टोला

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: नाशिकच्या तपोवनमध्ये हजारो झाडं तोडली जाणार असल्याने संताप

'Virat Kohli - Rohit Sharma मुळे अनेक रात्री झोपलो नव्हतो, त्यामुळे...', २०२७ वर्ल्ड कप खेळण्यावर भारताचा प्रशिक्षक स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT