Change in traffic Kasba Peth due to metro works road close from Pawle Chowk to Kamla Nehru Hospital  sakal
पुणे

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे कसबा पेठेत वाहतुकीत बदल

पवळे चौकापासून कमला नेहरू रुग्णालयापर्यंत रस्ता वाहतुकीस बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा पेठेतील मेट्रो रेल्वे स्थानकाच्या परिसरात पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पवळे चौकातून कमला नेहरु रुग्णालयाकडे जाणारा रस्ता दुचाकी वगळता अन्य वाहनांसाठी बंद राहील. इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कसबा पेठेतील साततोटी चौकापासून बुधवार पेठ मेट्रो स्थानकापर्यंत पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवळे चौकातून कमला नेहरु रुग्णालयाकडे जाणाऱ्या तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांना तात्पुरती बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे दुचाकी वगळता अन्य वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पर्यायी मार्ग-

पवळे चौकातून कमला नेहरु रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पवळे चौकातून पुण्येश्वर रस्त्याने कुंभारवेस चौकमार्गे जावे. तेथून कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने कमला नेहरु रुग्णालयाकडे जावे. पवळे चौकातून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कसबा पेठ पोलिस चौकीजवळील रस्त्याने माणिक चौकमार्गे फडके हौद चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

कमला नेहरु रुग्णालयाकडून पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कमला नेहरु रुग्णालयाजवळ चौकातून डावीकडे वळावे. महाराणा प्रताप रस्ता, देवजीबाबा चौक, गणेश रस्त्याने इच्छितस्थळी जावे. कमला नेहरु रुग्णालयाकडून उजवीकडे वळून कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयमार्गे वाहनचालकांनी कुंभारवेस चौकातून संताजी घोरपडे रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT