covid-19-hospital-coep 
पुणे

जम्बो हॉस्पिटलचे ढिसाळ व्यवस्थापन बदला; विविध संघटनांची मागणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - खासगी कंपन्यांकडे चालवायला दिलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ढिसाळ व्यवस्थापनामुळे तेथे जास्त खाटा उपलब्ध झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत जम्बो हॉस्पिटल राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणेकरांना पायाभूत आरोग्य सुविधा पुरविण्यात सपशेल पुणे महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. महापालिकेची बांधून तयार असलेली रुग्णालये अक्षरशः धुळखात पडून आहेत. पुण्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती आणि त्याबाबत उपाय सुचविण्यासाठी वस्तीपातळीवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या 34 संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी "कोरोना विरोधी जन अभियान' उभारले आहेत. त्यातून ही मागणी पुढे आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयावर आठशे खाटांचे कोविड केअर हॉस्पिटल (जम्बो हॉस्पिटल) उभारण्यात आले. एका खासगी कंपनीकडे "आऊटसोर्स' केलेल्या या प्रकल्पाचा पूर्ण फज्जा उडलेला दिसतो. रुग्णसंख्या वाढत असताना देखील अतिशय ढिसाळ व्यवस्थापनामुळे जास्त खाटा उपलब्ध झाल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. अशी परिस्थितीत जम्बो कोविड हॉस्पिटल सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी अभियानातर्फे करण्यात आली आहे. 

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारने आठशे खाटांचे जम्बो कोविड हॉस्पिटलची घोषणा केली होती. पण, अचानक तेथे तिनशेच खाटा कशा आल्या याचे पारदर्शक उत्तर सरकारने दिली पाहिजे, असेही अभियानाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. औषधांची उपलब्धता, काळा बाजार आणि अन्यायकारक वाटप होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातून तातडीने मार्ग काढला पाहिजे, असेही यात नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT