bhumkar-chauk 
पुणे

भूमकर चोकातील वाहतूकीमधील बदलामुळे चालकांमध्ये गोंधळ 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - भूमकर चौकातील वाहतुकीमध्ये पोलिसांनी सोमवारपासून (ता. 17) बदल केला. यामुळे भूमकर चौकाने मोकळा श्‍वास घेतला. मात्र मारूंजी वाय जंक्‍शन चौकात टू-टर्न घेण्यासाठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान या वाहतूकीमधील बदलांची पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी पाहणी केली. 

मुंबई-बंगलोर महामार्गावर पुण्याकडून आलेल्या वाहनांना आता थेट डांगे चौकाकडे वळण घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच डांगे चौकाकडून पुनावळेकडे जाणाऱ्या वाहनांनाही वाय जंक्‍शन येथून यु-टर्न घ्यावा लागत आहे. हिंजवडीकडून येणाऱ्या वाहनांनाही पुण्याकडे महामार्गावर वळण्यास मनाई केली आहे. या वाहनांनी डांगे चौकाच्या दिशेने सरळ जाऊन काळाखडक येथे यू-टर्न घेण्याची सूचना हिंजवडी वाहतूक पोलिसांनी केली आहे. 

पोलिसांनी केलेल्या बदलामुळे भूमकर चौकाने मोकळा श्‍वास घेतला असला तरी मारूंजी वाय जंक्‍शन चौकात वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. बहुतांश वाहन चालकांना या बदलाबाबत काहीच माहिती नव्हते.

सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी भूमकर चौकाला भेट देऊन पाहणी केली. मोठमोठे कंटनरमुळे मारूंजी वाय जंक्‍शन चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने या चौकात दिवसा अवजड वाहनांना बंदी करण्यासाठी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. अवजड वाहनांना पुनावळे मार्गे हिंजवडीकडे जाता येणार आहे. या बदलाबाबत अध्यादेश काढण्याची सूचनाही त्यांनी हिंजवडीचे वाहतूक पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांना केली. तसेच या नवीन बदलामुळे दोन सिग्नलचा वेळ वाचल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मारूंजी वाय जंक्‍शन चौकात सिग्नल बसविण्यात यावेत. तसेच महामार्गावरून आलेल्या वाहनांना हिंजवडीला जाण्यासाठी तसेच फेज दोन आणि तीनकडून आलेल्या वाहनांना पुनावळेकडे जाण्यासाठी लेफ्ट फ्री सिग्नल ठेवण्यास सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT