State Commission maharashtra Sakal
पुणे

ग्राहक आयोगाच्या आर्थिक न्यायक्षेत्रात बदल

फसवणूक झाल्याच्या रकमेवरून तो दावा कोणत्या ग्राहक आयोगात दाखल होणार याबाबत असलेल्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

फसवणूक झाल्याच्या रकमेवरून तो दावा कोणत्या ग्राहक आयोगात दाखल होणार याबाबत असलेल्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.

पुणे - फसवणूक (Cheating) झाल्याच्या रकमेवरून तो दावा कोणत्या ग्राहक आयोगात दाखल होणार याबाबत असलेल्या नियमांत (Rules) बदल करण्यात आले आहेत. आता जिल्हा ग्राहक आयोगाकडे (District Consumer Commission) ५० लाख रुपयांपर्यंतचे, राज्य ग्राहक आयोगाकडे ५० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंतचे आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दोन कोटी रुपयांपासून पुढील दावे दाखल करता येणार आहेत.

नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या आर्थिक न्यायक्षेत्रात केंद्र सरकारने गुरुवारी (ता. ३०) सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार आता आयोगाचे नवीन न्यायक्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहेत. नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये तिन्ही ग्राहक आयोगांचे आर्थिक न्यायक्षेत्र मर्यादित करणारी अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. त्यामुळे आता ५० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीची तक्रार ग्राहकाला जिल्हा पातळीवरच करता येणार आहे.

नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक आयोगांच्या आर्थिक न्यायक्षेत्राची मर्यादा वाढविण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाकडे एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे, राज्य ग्राहक आयोगाकडे एक कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंतचे दावे आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दहा कोटी रुपयांपासून पुढील दावे दाखल करता येत होते. त्यामुळे पूर्वी राज्य ग्राहक आयोगाकडे जाणाऱ्या तक्रारी जिल्हा ग्राहक आयोगाकडे येत होत्या, तर राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे जाणाऱ्या तक्रारी राज्य ग्राहक आयोगाकडे दाखल होत होत्या. त्यातून जिल्हा व राज्य आयोगांवरचा तक्रारींचा ताण वाढून, प्रलंबित दाव्यांच्या संख्येत वाढ होत होती. परिणामी ग्राहकांना जलदगतीने न्याय देण्याचा आयोगांचा उद्देश सफल होत नव्हता.

या निर्णयामुळे जिल्हा व राज्य ग्राहक आयोगावरील तक्रारींचा ताण कमी होणार आहे. आता केंद्र सरकारने ग्राहक आयोगांच्या आर्थिक न्यायक्षेत्राच्या व्याख्येतही सुधारणा करावी. वस्तू व सेवेसाठी ग्राहकाने दिलेल्या मोबदल्याऐवजी जुन्या कायद्यानुसार, वस्तू व सेवेची किंमत आणि ग्राहकाने मागितलेल्या भरपाईवर आयोगाचे आर्थिक न्यायक्षेत्र निश्चित करण्यात यावे. त्यामुळे ग्राहकांना आणखी फायदा होईल.

- ॲड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष , कन्झ्युमर ॲडव्होकेट्स असोसिएशन

पूर्वीची मर्यादा :

आयोग - तक्रारीची रक्कम

- जिल्हा - एक कोटी रुपयांपर्यंत

- राज्य - एक कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंत

- राष्ट्रीय - दहा कोटी रुपयांपासून पुढील

सुधारित मर्यादा :

आयोग - तक्रारीची रक्कम

- जिल्हा - ५० लाख रुपयांपर्यंत

- राज्य - ५० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत

- राष्ट्रीय - दोन कोटी रुपयांपासून पुढील दावे

नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक आयोगांच्या आर्थिक न्यायक्षेत्राची मर्यादा वाढविण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाकडे एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे, राज्य ग्राहक आयोगाकडे एक कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंतचे दावे आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दहा कोटी रुपयांपासून पुढील दावे दाखल करता येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT