PM modi Pune visit traffic update esakal
पुणे

Pune Traffic Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल, बदलले मार्ग आणि वेळ जाणून घ्या एका क्लिकवर

PM modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत सोमवारी (ता. २९) दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत सोमवारी (ता. २९) दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. खालील मार्गांवर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली. रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

  • टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.

  • सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद राहील.

  • बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.

  • पर्यायी मार्ग : मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रस्ता जंक्शन येथून इच्छित स्थळी.

  • खालील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.

  • गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रस्ता)- पर्यायी मार्ग : गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी.

  • भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रस्ता) - पर्यायी मार्ग : भैरोबानाला ते लुल्लानगर ते इच्छित स्थळी.

  • मोरओढा ते भैरोबानाला (एम्प्रेस गार्डन रस्ता)- पर्यायी मार्ग : मोरओढा घोरपडी रेल्वेगेट बी.टी. कवडे रस्त्याने इच्छित स्थळी.

  • भैरोबानाला ते मोरओढा- पर्यायी मार्ग : बी.टी. कवडे जंक्शन ते बी.टी. कवडे रस्त्याने उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी.

  • मोर ओढा ते मम्मादेवी - पर्यायी मार्ग : मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी.

गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, भैरोबानाला चौक, आंबेडकर पुतळा चौक कॅम्प, कोरेगाव पार्क जंक्शन, ताडीगुत्ता चौक, नोबल हॉस्पिटल या भागातील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. दुपारी दोन ते रात्री दहा या कालावधीत या परिसरातून जाण्यासाठी बाहेरील रस्ते - उदा. नगर रस्त्याने जाण्यासाठी पोल्ट्री फार्म चौक ते संगमवाडी मार्गे. तसेच सोलापूर रस्ता ते जेधे चौकाकडे जाण्यासाठी लुल्लानगर, गंगाधाम चौक, सातारा रस्त्याचा वापर करावा. तसेच, मंतरवाडी, खडी मशिन चौक-कात्रज रस्ता या बाह्यवळण मार्गाचा आणि खराडी बायपास, मुंढवा, नोबल हॉस्पिटल रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT