पुणे

औंधमधील नदीवर नव्या पुलाची उभारणी; पुण्यातील वाहतुकीत बदल

सकाळवृत्तसेवा

पुणे ः औंध-वाकड-सांगवी रस्त्यावरील जुन्या पुलाजवळ नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला असून हा बदल जानेवारी 2021 पर्यंत असणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

औंधमधील डिमार्टजवळ नदीवर असलेला जुना पूल काही वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. त्यामुळे औंध, वाकड व सांगवीला जोडणाऱ्या या पुलाजवळ पुलाजवळ नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या कामाला 7 ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी औंध, वाकड, सांगवी पूल बंद करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी चतुःश्रृंगी वाहतूक विभागाकडून बदल केले आहेत. काम पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

असा असेल वाहतुकीमध्ये बदल 
* सांगवी, वाकडकडे जाणारी वाहतूक भाले चौक, परिहार चौक, ऋषी मल्होत्रा चौक, राजीव गांधी पुलावरून पुढे जाईल. 
* सांगवी वाकडकडे जाणारी वाहतूक भाले चौक, नागरस रोड, आंबेडकर सेतू मार्गे जाईल.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT