Changes in transportation for Dahihandi festival tomorrow 
पुणे

Krishna Janmashtami : दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये उद्या बदल

सकाळ वृत्तसेवा

गोकुळाष्टमी :
पुणे - दहीहंडी व वीर गोगादेव उत्सवासाठी गर्दी टाळण्यासाठी मध्यवर्ती भागासह लष्कर परिसरामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये पाच ते रात्री दहापर्यंत बदल करण्यात आला आहे. 

बंद मार्ग, पर्यायी रस्ते 
शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएल बस शिवाजीनगर येथील स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे स्वारगेटला जातील, शिवाजी रस्त्यावरून पुणे स्टेशन, हडपसरला जाणाऱ्या बस जिजामाता चौकातून डावीकडे वळून फडके हौद, दारूवाला पूलमार्गे पुढे जातील,

 शिवाजी रस्त्यावरून जाणारी हलकी वाहने, दुचाक्‍या जिजामाता चौकातून फडके हौद, देवजीबाब चौक, हमजेखान चौकमार्गे स्वारगेट. अन्य वाहने बुधवार चौकातून उजवीकडून अप्पा बळवंत चौकमार्गे पुढे जातील, लक्ष्मी रस्त्यावरून बेलबाग चौकाकडे जाणारी वाहने सोन्या मारुती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक, बुधवार चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे पुढे.

गोगादेव उत्सवानिमित्त बदल
मिरवणूक मार्ग ः लष्कर परिसरातील न्यू मोदीखाना येथून शनिवारी दुपारी चार वाजता मिरवणूक सुरू होईल. पूलगेट पोलिस चौकी, महात्मा गांधी रस्ता, सेंटर स्ट्रीट, महावीर चौक, कोहिनूर हॉटेल, पूलगेट पोलिस चौकमार्गे मेढीमाता मंदिर. 

बंद व पर्यायी मार्ग 
महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक वाय जंक्‍शन येथे बंद असेल. तेथून खाणे मारुती चौकाकडे वाहतूक वळविण्यात येईल. तसेच सोलापूर रस्त्यावर जाणारी वाहतूक खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळविली आहे. शहरात येणारी वाहतूक खाणे मारुती चौक, ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौक, महावीर चौकमार्गे महात्मा गांधी रोड किंवा इंदिरा गांधी चौक, लष्कर पोलिस ठाणेमार्गे पुढे,  मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशिदीदकडे जाणारी वाहतूक बंद असेल. वाहतूक चुडामन तालीममार्गे पुढे जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलीस नव्हेत, RSSचे गुंड', दीपकेंचे आरोप; वांगचुक रुग्णालयात, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

SIR ला हलक्यात घेऊ नका... तुमचं नाव मतदार यादीतून कट होणार? नंतर काय कराल? सोप्या भाषेत माहिती

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेले; सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Satej Patil SIR Process : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक; सतेज पाटलांची सरकारवर जोरदार टीका

Nagpur News: नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे २०२७ पर्यंत पूर्ण होणार; देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा नवा कॉरिडॉर साकारणार

SCROLL FOR NEXT