chaos Due to less Stock on Covid center pune
chaos Due to less Stock on Covid center pune 
पुणे

लसीकरण केंद्रांवरील गोंधळ कायम! पुरवठा कमी झाल्याने वादावादी

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील लसीकरणाला सुरवात होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला, परंतु केंद्रांवरील गोंधळ मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे मात्र केंद्रांवर लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे दररोज वादावादीचे प्रकार वाढू लागले आहेत. पुणे शहरात १ जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वॅर्कर्स यांना लसीकरण करण्यात आले. एक मार्चपासून साठ वर्षांवरील नागरीकांना तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृकता निर्माण झाली आहे. परिणामी प्रत्येक केंद्रांवर लसीकरणासाठी सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिकांची नोंदणी होत आहे. पहाटे साडेपाचपासून केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. परंतु केंद्रांत दीडशे ते दोनशेच डोसचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या अन्य नागरिकांना डोस न घेताच परत जावे लागत आहे. पाच ते सहा तास थांबूनदेखील लस मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातून केंद्रावर वादावादीचे प्रकार वाढत आहे. त्याचा त्रास केंद्रांवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

''लसीकरणासाठी नोंदणी करून महापालिकेच्या दवाखान्यात लस घेण्यासाठी गेलो. चार तास थांबल्यानंतर अचानक डोस संपले असल्याचे जाहीर करण्यात आले. जर पुरेसे डोस उपलब्ध नव्हते, तर नागरिकांना त्यांची कल्पना देणे गरजेचे होते. ती न दिल्यामुळे दिवसभर थांबून तसेच परत जावे लागले. हा भोंगळ कारभार कधी थांबणार आहे.''
- किशोर जोगळेकर, ज्येष्ठ नागरिक

''नोंदणी केल्यानंतर आज लसीकरणासाठी केंद्रांवर बोलविण्यात आले होते. त्यासाठी सकाळीच केंद्रांवर जाऊन थांबले. परंतु नंबर येण्याआधीच लस संपली आहे. उद्य या असे सांगण्यात आले. जर केंद्रावर किती नोंदणी झाली आहे, हे माहिती आहे, तर तेवढ्या लसीचा पुरवठा का केला जात नाही.''
-सुरेखा वाळके, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT