पुणे

चपळगावच्या आठवडा बाजारात झाली पंधरा लाखांची उलाढाल.. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातुन रविवारच्या आठवडा बाजाराचा शुभारंभ

CD

AKK26B05907
चपळगाव (ता. अक्क्लकोट) ः येथे आठवडा बाजारचा शुभारंभ करताना सरपंच वर्षा भंडारकवठे, अप्पासाहेब पाटील, उमेश पाटील व इतर.

चपळगावच्या पहिल्याच आठवडा बाजारात १५ लाखांची उलाढाल

अक्कलकोट, ता. २५ ः तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वात मोठे गाव म्हणून चपळगावची ओळख आहे. शेजारीच असलेले कुरनूर धरण आणि पर्यायाने वाढलेले बागायतीचे क्षेत्र, वाढती लोकसंख्या, सोलर प्लॅन्टवर आलेले हजारो कामगारांची व्यवस्था व्हावी. तसेच स्थानिक शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी दर रविवारी चपळगावचा आठवडा बाजार सुरू करण्यात आल्याचे सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी सांगितले. पहिल्याच आठवडा बाजारात पंधरा लाखांची उलाढाल झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या बाजाराचे उद्‍घाटन सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सुवर्णा कोळी होत्या. शिलान्यास माजी सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते झाले तर व्यासपीठावर निराणी ग्रुपचे रविकांत पाटील, उमेश पाटील, मार्केट कमिटीचे व्हा.चेअरमन अप्पासाहेब पाटील, ग्रामपंचायत अधिकारी विनोद डावरे उपस्थित होते.
चपळगावच्या बाजारात भाजीपाला, शेळी व्यापार, कापड, स्टेशनरी, चप्पल, किराणा, मसाला व्यापार, मांसाहारी, फळे, हॉटेल, कोल्ड्रिंक्सचा व्यापार झाला. यातून जवळपास पंधरा लाखांची उलाढाल झाली. बाजाराच्या यशस्वितेसाठी लिपिक उमेश सोनार, कर्मचारी पांडुरंग चव्हाण, विष्णुवर्धन कांबळे, यमुनाबाई गजधाने, अमोल गजधाने, रवी कोरे, मिनाज पटेल आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT