Prashant Jagtap sakal
पुणे

विना परवाना आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

परवानगी न घेता राज्यपालांच्या नावाने घोषणाबाजीकरून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : परवानगी न घेता राज्यपालांच्या नावाने घोषणाबाजीकरून महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतर्फे तक्रार देण्याची अपेक्षा असताना ती दिली गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश हांडे, दीपाली धुमाळ यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई ज्ञानेश माने यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात (२८ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप व पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा इमारतीत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रोखले गेले.

परंतु, त्यांनी तरीही इमारतीत घुसून जुन्या इमारतीच्या पायऱ्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावाने घोषणाबाजी केली. तसेच, आंदोलन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तत्पूर्वी आंदोलनाबाबत पोलिस विभागाची परवानगी घेतली गेली नव्हती. आंदोलन झालेले ठिकाण पुणे मनपाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार द्यावी की पोलिस विभागाने तक्रार द्यावी, असा संभ्रम निर्माण झाला होता. पालिकेकडूनच तक्रार देणे अपेक्षित असतानाही त्यांनी तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केली. त्यानंतर पोलिस विभागातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT