Court
Court Sakal
पुणे

निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अपसंपदा बाळगल्याप्रकरणी नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २४) ४० हजार पानांचे पहिले दोषारोपपत्र (Chargesheet) न्यायालयात (Court) दाखल केले आहे. (Chargesheet Filed against Suspended Joint Director Hanumant Nazirkar)

नाझीरकर व त्यांच्या कुटुंबीयांकडे ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या असल्याचे या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर, गीतांजली नाझीरकर, भास्कर नाझीरकर, भाचा राहुल खोमणे, अनिल शिपकुळे, बाळासाहेब घनवट आणि विजयसिंह धुमाळ अशा ८ जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही ३० मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

हनुमंत नाझीरकर हे नगररचना विभागामध्ये अमरावतीत सहसंचालक म्हणून कार्यरत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. २३ जानेवारी १९८६ ते १८ जून २०२० या ३४ वर्षामध्ये त्यांनी तब्बल ८२ कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता लाचखोरीतून मिळविल्याचे उघड झाले आहे. हनुमंत नाझीरकर यांनी ही मालमत्ता २०१० ते २०१६ दरम्यान आपली पत्नी आणि सासरे यांच्या नावावर खरेदी केली आहे. नाझीरकर यांच्या ३८ कंपन्या व त्यात गुंतवलेला पैसा याविषयी दुसरे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या २० बेनामी मालमत्ताही आढळून आल्या आहेत. त्याबाबतची वेगळी कारवाई आयकर विभागामार्फत करण्यात येत आहे.

दोषारोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे :

- नाझीरकर यांनी गेल्या ३४ वर्षामध्ये ८२ कोटी ३४ लाख रुपयांची अपसंपदा मिळवली

- पत्नी व सास-याच्या नावाने देखील संपत्तीची खरेदी

- नाझीरकर कुटुंबीच्यांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या

- नाझीरकरांनी गुंतवलेल्या पैशांविषयी स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT