Anil Bhosale Sakal
पुणे

आमदार अनिल भोसलेसह सातजणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आमदार अनिल भोसले यांच्यासह सातजणांविरुद्ध पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आमदार अनिल भोसले यांच्यासह सातजणांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी (ता. १५) पुरवणी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले.

भोसले यांच्याबरोबरच मंगलदास विठ्ठल बांदल, बँकेचे संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, हितेंद्र विराभाई पटेल आणि मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जदार व गुंतणूकदारांची ४९६ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिवाजीनगर न्यायालयात त्याबाबतच्या ७३८० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र बुधवारी दाखल करण्यात आले. सायबर क्राईम व आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, तपास अधिकारी सतीश वाळके व त्यांच्या पथकाने हा तपास पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, एकाच रात्रीत सहा वेळा संशयास्पद व्यवहार; परदेशातून घडली घटना

Khadakwasla Dam Water Level : खडकवासला धरणसाखळीत 80.19 टक्के पाणीसाठा; पवना, मुळशी धरणात किती पाणी? पुण्यावर ओढवणार पाणीकपातीचं संकट?

Vande Bharat Sleeper: मुंबई-नागपूर वंदे भारत स्लीपर कधी धावणार? मुंबई-बंगळुरूला मिळाली हिरवा झेंडा ;उपराजधानीची उपेक्षाच

Latest Marathi News Live Update : जळगावात खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत गोळीबार; विद्यार्थ्यांची धावपळ

Sangli District Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी; गोपीचंद पडळकर, संजय काका पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

SCROLL FOR NEXT