पुणे

पाटबंधारे खात्याच्या लेटरबाँबला दणका; संतप्त शेतकऱ्यांनी अखेर पाणी सोडलेच

भरत पचंगे

शिक्रापूर : शिक्रापूर परिसरातील दहा गावांना रविवारी (ता.10) चासकमानचे पाणी देण्याची लेखी ग्वाही करुन घूमजाव करीत एक दिवस आधीच पाणी देता येणार नाही, असे लेखी देणाऱ्या पाटबंधारे खाते अधिकाऱ्यांच्या कुठल्याच इशाऱ्याला दाद न देता संतप्त शेतकऱ्यांनी आज ठरल्याप्रमाणे स्वत:हून पाणी सोडून घेतले. पर्यायाने पाटबंधारे खात्याच्या आडून पाण्याचे राजकारण करणाऱ्या तमाम राजकीय नेत्यांनाही शेतकऱ्यांचा हा मोठा दणका समजला जात आहे. 

शिक्रापूर परिसरातील दहा गावांना पाणी सोडावे म्हणून 5 रोजी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना 10 रोजी पाणी सोडू, असे लेखी दिलेल्या पाटबंधारे खात्याने काल अचानक पाणी सोडता येणार नाही, असा लेटरबॉंब आंदोलक शेतकऱ्यांवर टाकला. या बॉंबने जराही विस्कळीत न होता शेतकऱ्यांनी आज पहिल्या पत्राचाच आधार घेत तसेच लेखी देऊनही शासकीय सेवेत कुचराई केली गेली. या गंभीर परिस्थितीत काही अघटीत घडले तर पाटबंधारे खाते त्याला जबाबदार राहील, असे शिक्रापूर पोलिसांकडे काल पत्र दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अत्यंत प्रक्षोभक व संतप्त शेतकऱ्यांनी पहिल्या पत्रानुसार आज रात्री दहाची वाट न पाहता थेट कोरेगाव-धानोरे शाखेची चारी सकाळी दहा वाजताच मोकळी केली आणि जोरदार जल्लोष करीत शेतकरी, दहा गावांचा जयजयकार तसेच कायदेशीर हक्क असतानाही पाणी न देणा-या प्रशासनाचा, त्यांच्यावर दबाव आणणा-या राजकीय नेत्यांचा निषेध करीत विजयोत्सव साजरा केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या संपूर्ण आंदोलन प्रकरणाला कायदेशीर पाठबळ देणारे अ‍ॅड. अशोक पलांडे व अ‍ॅड.दिग्विजय पलांडे यांनी याबाबत सांगितले की, चासकमानच्या पाणी वितरणात दरवेळी पूर्व व पश्चिम असा शेतकरी भेद करुन भांडणे लावली जातात. मूळ दोन्ही भागांना एकत्र करुन तसेच पाण्याचा मूळ कायदेशीर अग्रहक्क नेमका कुणाचा याबाबत एका व्यासपीठावर आणले जात नाही, त्यामुळे हा प्रश्न गेली अनेक वर्षे असाच भडकत आहे. याबाबत राजकारण्यांनी नव्हे तर प्रशासनाने पुढाकार घेवून पाणी वितरणाचे वेळपत्रक आधी जाहीर करुन त्यानुसारच पाणी वितरीत केले तरच हा प्रश्न सुटणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाआघाडीचे नेते एकत्र येऊन प्रश्न मिटवित का नाहीत? 

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीची महाआघाडी असताना शेतक-यांना स्वत:हून पाणी सोडण्याचे पाऊल उचलावे लागते हे सरकार म्हणून गंभीर आहे. याबाबत आंबेगाव-शिरुर व शिरुर-हवेली या दोन्ही मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी पुढाकार घेवून या प्रश्नाला त्वरित मार्गी लावायला हवे. या प्रकरणात शिवसेना म्हणून आम्ही शांत आहोत. मात्र पुढील काळात शेतक-यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल व थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आमचे नेते शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांना या प्रकरणात हस्तक्षेप करायला भाग पाडायला लागेल.

- जयश्री पलांडे (शिवसेना नेत्या)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT