पुणे

चास-कमान कालव्याच्या कामात दिरंगाई

CD

चास, ता. ४ : चास-कमान धरणाच्या कालव्याचे ० ते ७२ किलोमीटर अंतराचे अस्तरीकरण रखडवणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याचे काम काढून घेण्याची मागणी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत केली. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर असून, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचे काम करू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमदार काळे म्हणाले की, कालव्याच्या ० ते ७२ किमी अंतरात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने ४५० ते ५०० क्युसेकने सोडलेले पाणी शिरूरपर्यंत पोहोचत नाही. ३० दिवसांचे आवर्तन ४५ दिवस चालूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. या कामाचे निविदा निघूनही कंत्राटदाराने अद्याप काम सुरू केलेले नाही. यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त करत, त्यांनी संबंधित मंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कमकुवत झालेले पूल गळतीला कारणीभूत
खेड तालुक्यातील गळती थांबवण्याऐवजी सरकार पुढच्या टप्प्यातील कामाची घाई का करत आहे? तसेच, ओढ्यांवरील जुने व कमकुवत झालेले पूल गळतीला कारणीभूत ठरत असून, त्यांचे तातडीने रचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करून नवीन पूल बांधण्याची मागणीही आमदार काळे यांनी केली. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: शिवराय नसते तर आपल्याला शाळेत शिकावी लागली असती इराणची भाषा; काय आहे इतिहास?

जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची बॅग अन् सरकारी पिस्तूल चोरीला; वांद्रे रेल्वे स्थानकातील घटना...

Yermala News : एसटी प्रवास रोखण्यामागे NCMC कार्ड सक्तीचा डाव? परिवहन विभागाच्या दंडराजवर संताप, राज्य सरकारविरोधात खळबळ

Latest Marathi News Live Update : इस्रायल-इराण संघर्ष परिस्थितीमुळे लोकांसाठी आम्ही वेबसाइट आणि हेल्पलाइन नंबर जारी केलाय - गिरीश महाजन

Nashik News : नाशिकची अनोखी परंपरा! धुलिवंदनाला वीरांच्या मिरवणुकांनी दुमदुमली दक्षिण गंगा

SCROLL FOR NEXT