crime 
पुणे

'आरटीओ'ची फसवणूक करणाऱ्या बस मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बनावट प्रवासी वाहतूक परवाना काढून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बस मालक महिला व चालकाविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गजानन गुरव (वय 42, रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुरव हे डिसेंबर 2019 मध्ये वायुवेग पथक क्रमांक तीनमध्ये कार्यरत होते. यावेळी त्यांनी शास्त्रीनगर चौकात एक खासगी प्रवासी बस थांबवली. बसची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये 25 प्रवासी होते. संबंधीत प्रवाशांना पुणे, शनि शिंगणापूर, शिर्डी,वणी, सटाणा, ठाणे, मुंबई मार्गे पुन्हा पुणे असा प्रवास घडविण्यात येणार होता. बसच्या क्रमांकावरून माहिती घेतल्यानंतर बसचा कर थकीत असून योग्यता प्रमाणपत्राची मुदत देखील संपल्याचे निदर्शनास आले.

वाहन चालकाने तात्पुरता परवाना क्रमांक फिर्यादीकडे हजर केला होता. हा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयात पडताळणीसाठी जमा करुन बस वाघोली येथील वाहन पार्किंगमध्ये जमा करण्यात आली होती. दरम्यान परवान्याची तपासणी केल्यानंतर हा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेला नसून तो बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बसमालक महिलेसह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT