ST Depot sakal
पुणे

एसटी स्थानकांवर खाद्यपदार्थांमधूनही होतेय लूट

पुणे - एसटीने औरंगाबादहून पुण्याकडे निघालो होतो. अहमदनगरला आल्यावर ‘नाथजल’ पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मागितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एसटीने औरंगाबादहून पुण्याकडे निघालो होतो. अहमदनगरला आल्यावर ‘नाथजल’ पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मागितले.

पुणे - एसटीने (ST) औरंगाबादहून पुण्याकडे निघालो होतो. अहमदनगरला आल्यावर ‘नाथजल’ पाण्याच्या बाटलीसाठी (Water Bottle) २० रुपये मागितले, तिच्यावर छापील किंमत १५ रुपये आहे, तरीही २० रुपये कसे मागता आहात, असा प्रश्न विक्रेत्याला केला असता, त्याने हातातली बाटली हिसकावून घेतली. ‘१५ रुपयांना नाही, २० रुपयाला घ्यायची असेल, तर घे नाहीतर नको घेऊस.’ असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे प्रवासी विवेक जाधव यांनी सांगितले.

पुणे, वाकडेवाडी (शिवाजीनगर), स्वारगेट या एसटी स्थानकांवर एसटी महामंडळाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘नाथजल’ची विक्री छापील किमतीपेक्षा पाच रुपये आगाऊ घेऊन केली जाते. याची माहिती समोर आली, त्यावर ‘सकाळ’ने ‘नाथजल बाटली’तून पाण्यासारखा पैसा! या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर प्रवाशांनी अनुभव व्यक्त केले.

खाद्यपदार्थांची विक्रीही अधिक किमतीने होते. गंगाखेडच्या एसटी स्थानकातील स्टॉलवरून बिस्कीटपुडा विकत घेतला असता, विक्रेत्याने छापील किमतीपेक्षा अधिक किंमत सांगितली. त्याला जास्त पैसे का? असे विचारले असता, ‘‘आम्हाला एसटी स्थानकातील गाळा भाड्याने घेण्यासाठी जास्त पैसे देऊन निविदा भरावी लागते, म्हणून हे पैसे आम्ही ग्राहकांकडून अशा प्रकारे वसूल करतो.’ असे उत्तर दिले.

प्रवासी म्हणतात...

  • कुठल्याच स्थानकावर या बाटलीची किंमत १५ रुपये आहे, अशी जाहिरात नाही

  • तक्रार केल्यास विक्रेते अंगावर धावून येतात

  • परिवहनमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

  • पाण्याची बाटलीची किंमत मोठ्या अक्षरांत लिहून फलक जागोजागी लावावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मध्यपूर्वेतील संघर्ष ‘युद्ध नव्हे, हुकूमशाही’ अजमेर शरीफ दर्गाहप्रमुखांचा घणाघात

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT