पुणे

शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे ः डॉ. लाड

CD

महाळुंगे पडवळ, ता. २२ : “आत्ताचे कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतकऱ्यांनी आधुनिक व विषमुक्त शेतीकडे वळणे गरजेचे आहे,’’ असे विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. दत्तात्रय लाड यांनी केले.
कळंब (ता. आंबेगाव) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, ज्येष्ठ नागरिक संघ कळंब आणि ग्रामपंचायत कळंब यांच्या वतीने केंद्र सरकारच्या खेती बचाव अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
डॉ. लाड म्हणाले, “महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्ले स्टोअरमधून ॲप घेऊन शेतीविषयक माहिती मिळवावी. शेतकऱ्यांनी ऊस शेतीबरोबर तरकारी पिके, फुलशेती, फळबागा या शेतीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.’’
डॉ. रणजित निंबाळकर यांनी ‘पिकांचे एकात्मिक खत व्यवस्थापन’, डॉ. विकास खंडेराव भालेराव यांनी ‘खरिपातील पिके व फळ पिकांचे रोग नियंत्रण’ व डॉ. नजीर तांबोळी यांनी ‘भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व कीड नियंत्रण या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे वनस्पती शास्त्र प्रा. डॉ. विकास भालेराव यांनी केले. आभार राहुल कानडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सतीश जाधव, अर्चना वाटाणे, रूपाली टेमकर, आर. आर. ढोले, एस. बी. बिराजदार, शिवानंद बिराजदार, एस. एस. गंधट यांनी केले.
यावेळी डॉ. गणेश कदम, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, माजी सरपंच शरद भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT