पुणे

रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या वर गुन्हा दाखल

CD

चेन्नई-एकतानगर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चोरट्यास अटक

सोलापूर, ता. २४ : चेन्नई-एकतानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस दुधनी स्टेशनवर आली असता, प्रवाशांचे मोबाईल पळविणाऱ्या एका चोरट्यास आरपीएफच्या जवानांनी पकडले.
चेन्नई एकतानगर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक सहायक उपनिरीक्षक आणि ४ आरपीएफ कर्मचारी आणि २ जीआरपी कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक होते. १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० वाजता गाडी दुधनी स्टेशनवर असता, एक संशयास्पद व्यक्ती आरक्षित डब्यातून जनरल डब्याकडे धावताना दिसला. चौकशीदरम्यान बेल्लारी (जि. कर्नाटक) येथील गोपीकृष्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीने तीन मोबाईल फोन आणि ५,१०० रुपयांची रोकड चोरल्याची कबुली दिली. त्याच्या तपासणीत अंदाजे १.५२ लाख किमतीचे मोबाईल फोन (आय-फोनसह), मनगटी घड्याळ, पॉवर बँक, चार्जर आणि इअरफोन्स अशा चोरीच्या वस्तू आढळल्या. आरोपीला पुढील कारवाईसाठी सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT