chhagan bhujbal out of jail because of me says adv prakash ambedkar Sakal
पुणे

Pune News : माझ्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगाबाहेर; ॲड. प्रकाश आंबेडकर

‘‘छगन भुजबळ यांच्याविषयी नाराजी नाही. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी माझाच पुढाकार होता.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘छगन भुजबळ यांच्याविषयी नाराजी नाही. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी माझाच पुढाकार होता. मी कोर्टाबद्दल आरडाओरडा केला नसता तर ते बाहेर आले नसते. भुजबळ यांनी आम्हाला सोबत यावे, असे म्हटले आहे. मात्र, आम्हाला त्याची गरज नाही,’’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे मंगळवारी केला.

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ॲड. आंबेडकर यांनी समता भूमी येथे त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भुजबळांबद्दल माझी नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भुजबळांना तुरुंगातून सोडून देण्याबाबतच्या निर्णयास दिरंगाई होत होती. त्यावेळी संबंधित न्यायाधीशांबद्दल मी आरडाओरडा केला. त्यमुळे भुजबळ तुरुंगातून बाहेर आले.

माझी भुजबळांवर नाराजी असती तर मी सार्वजनिकरित्या त्या न्यायाधीशाला शिव्या घातल्या नसत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भुजबळांबद्दलचा निर्णय घेतला नाही तर संबंधित न्यायाधीशावर खटला चालवता येऊ शकतो, हे लक्षात घ्यावे असे जाहीररित्या बजावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळांना सोडून देण्यात आलं.

परंतु, भजबळ यांनी त्याची कधीच जाणीव ठेवली नाही, असेही डॉ. आंबेडकर म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा जनक मी आहे. ६ डिसेंबर नंतर हिंदू- मुस्लिम किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशा दंगली होऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

पॅलेस्टाईन - इस्राईल युद्धाचा परिणाम भारतालाही भोगावे लागणार आहेत. मुंबईत ८ डिसेंबरला आझाद मैदानात शांती सभा घेण्यात येणार आहे. मुस्लिम संघटना आणि आम्ही त्या सभेला उपस्थित राहणार आहोत. आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे धार्मिक चष्म्यातून बघता कामा नये, असेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.

‘‘महात्मा फुलेंना त्यांच्या काळात मोठा त्रास देण्यात आला. जे धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना देशभक्त ठरवण्यात आले. जे सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना ब्रिटिशांचे हस्तक ठरवण्यात आले. सध्या अशीच परिस्थिती आहे.

आम्ही संविधान बदलणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी ते म्हणावे तरच आम्ही मान्य करू,’’ असेही त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात सरकार कोणाचे असेल ते माहिती नाही पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT