Chhatrapati Sahakari Sugar Factory 12 lakh metric tons of crushing sugarcane prashant kate pune  sakal
पुणे

छत्रपतीने १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा केला पूर्ण; प्रशांत काटे

१७८ दिवसामध्ये १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये १७८ दिवसामध्ये १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.छत्रपती कारखान्याच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामास २४ ऑक्टोबर २०२१ राेजी सुरवात झाली. कारखान्याच्या संचालक मंडळाने सुरवातीपासून १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उदिष्ठ ठेवले होते. १७८ दिवसामध्ये कारखान्याने उदिष्ठ पूर्ण केले.

कारखान्याने आजपर्यंत १२ लाख १ हजार १७७ मेट्रीक टन उसाचे गाळप करुन १३ लाख १५ हजार ३०० क्विंटल साखरेची निर्मिती केली. यामध्ये ८ लाख २८ हजार ७७० मेट्रीक टन सभासदांचा उस गाळप केला असून ३ लाख ७२ हजार ४०७ मेट्रीक टन गेटकेनच्या उसाचे गाळप केले आहे. साखरेचा उसाचा उतारा ११.०७ टक्के मिळाला असून आत्तापर्यंत कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ६ कोटी ११ लाख १ हजार ९०० युनिट विजेची निर्मिती केली असून यातील ३ कोटी ९७ लाख ७४ हजार युनिट महावितरणला निर्यात केली आहे.

यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की,हंगामाच्या सुरवातीला संचालक मंडळाने १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उद्ष्ठि ठेवले होते. कारखान्याचे सभासद, परीसरातील शेतकरी, कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी,कर्मचारी व उसतोडणी कामगार व वाहतुकदारांच्या सहकार्यामुळे उद्ष्ठि पूर्ण करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३० हजार मेट्रीक टन उस शिल्लक असून येत्या काही दिवसामध्ये कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप पूर्ण करण्यात येणार असून सभासदांनी चिंता करु नये असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT