पुणे

‘जेन झी’प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

CD

सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ ः ‘जेन झीं’ची राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्यांच्याशी संवाद ठेवल्याने ती चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. काही ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत; परंतु हे गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश असून, ही प्रक्रिया सुरू असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचा आढावा घेण्यासाठी ते शहरात आले होते. यावेळी महासंचालक दाते यांनी छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, धाराशिव या ठिकाणचे दाखल गुन्हे, त्यात गुन्हे उघडकीस आणल्याचे प्रमाण, अपघातात झालेल्या मृत्यूची संख्या याबाबत आढावा घेतला. त्यात गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण आणि शिक्षेचे प्रमाण कसे वाढवता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. पोलिसांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, हे त्यांनी जाणून घेतले. त्या सोडविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हेदेखील त्यांनी समजून घेतले.
--------------
चौकट
------------
राज्यात एकूण
१५ हजार पदे भरली
------------
राज्यात पोलिसांची २२ हजार पदे रिक्त होती. त्यातील १६ हजार पदे भरली आहेत. आता उपनिरीक्षकांचा विषय आहे, तर एमपीएससीमार्फत ही पदे भरण्याची प्रक्रिया होईल, अशी माहिती दाते यांनी दिली.
--------------
चौकट
------------
‘जेन झीं’वर होणारे
हल्ले थांबविले
------------
‘जेन झीं’च्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर इतर संघटनांच्या माध्यमातून होणारे हल्ले आम्ही थांबविले. त्यांना सुरक्षा दिली. त्यामुळे संभाव्य घटना टळल्या. ‘जेन झी’ तरुणाईशी आमचा संवाद चांगला राहिल्याने ही आंदोलने चांगल्या पद्धतीने हाताळली गेली, असेही दाते यांनी स्पष्ट केले.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT