छत्रपती संभाजीनगरमध्ये २००० ते २५०० रुपये
ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) ढोबळ्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी २२५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३० जुलै रोजी ३० क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १ ऑगस्ट रोजी १६ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २ ऑगस्ट रोजी ५५ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३ ऑगस्ट रोजी ढोबळ्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली तर सरासरी दर १८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ४ ऑगस्टला ३६ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५ ऑगस्टला ढोबळ्या मिरचीची आवक २६ क्विंटल तर सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.