पुणे

बाजार आढावा.... छत्रपती संभाजीनगर येथे कांदा 1700 ते 4750 रुपये प्रतिक्विंटल

CD

छत्रपती संभाजीनगर येथे
१,७०० ते ४,७५० रुपये

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३) कांद्याची ५ हजार २५३ क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार ७०० ते ४ हजार ७५० रुपये दर मिळाला, तर सरासरी दर ३ हजार २२५ रुपये प्रतिक्विंटल राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७ ऑगस्टला कांद्याची ६ हजार २१८ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी कांद्याला १ हजार ६०० ते ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता, तर सरासरी दर २ हजार ८५० रुपये राहिला.

त्यानंतर २९ ऑगस्टला कांद्याची २ हजार ५३ क्विंटल आवक होऊन सरासरी दर २ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३० ऑगस्टला ४ हजार ७२९ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी २ हजार ९०० रुपये दर मिळाला. ३१ ऑगस्टला १ हजार ९९३ क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर २ हजार ९५० रुपये राहिला.

१ सप्टेंबरला १ हजार ४३५ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सरासरी दर ३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. तर २ सप्टेंबरला १ हजार ८६५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी २ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सिल्लोडमध्ये मराठा समाज आक्रमक; बैलगाड्या जनावरांसह तासभर रास्तारोको

'लक्ष्मी निवास' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; जान्हवीच्या आयुष्यात नव्या संकटाची चाहूल; कोण आहे ही?

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंनी उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांची घेतली भेट

Supriya Sule on Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

SCROLL FOR NEXT