chhatrapati shivaji maharaj and sambhaji maharaj palkhi warm welcome at manchar sakal
पुणे

शिवनेरी ते पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजे भेट पालखी सोहळ्याचे मंचरला जल्लोषात स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजू शिंदे यांनी केलेली वेशभूषा व शिवनेरी किल्ल्याप्रमाणे केलेली पालखीची आकर्षक सजावट लक्षवेधक ठरली

डी. के वळसे पाटील

मंचर : “स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री शिवनेरी गड (ता.जुन्नर) ते श्री पुरंदर गड (ता.पुरंदर) या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुराजे भेट पालखी सोहळ्याचे स्वागत मंचर (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.५) जल्लोषात करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती संभाजी महाराज कि जय”, “जय शिवराय” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

छत्रपती संभाजी महाराज चौकात व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सवाद्य मिरवणुकीने पालखी रथाचे आगमन झाले. हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबाजी चासकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे, बाबाजी आवटे,

सचिन बांगर,बहिरू निघोट यांच्या हस्ते झाले. अग्रभागी पालखी सोहळ्याचे प्रमुख बाजीराव महाराज बांगर, राम पाटील, श्यामकांत निघोट, वनाजी बांगर, बाबासाहेब दिघे, प्रकाश बोऱ्हाडे, संभाजीराजे इंदोरे, सचिन कार्ले, सचीन उढाणे बजरंग दल कार्यकर्ते व अन्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजू शिंदे यांनी केलेली वेशभूषा व शिवनेरी किल्ल्याप्रमाणे केलेली पालखीची आकर्षक सजावट लक्षवेधक ठरली. पालखीची सजावट गेली पाच वर्ष विनामुल्य करणारे खंडू दुराफे, पंढरीनाथ दुराफे व बाजीराव दुराफे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी शिव भक्तांची गर्दी झाली होती.

बजरंग दलाच्या वतीने फटक्याची आतषबाजी व पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पालखी पेठ गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. पेठ येथे स्वराज्य संघाचे राज्य संपर्कप्रमुख दिलीप पवळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक बाजारे, अमित कातळे, ज्ञानेश्वर एरंडे यांनी पालखी सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांचे फेटे बांधून स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT