पुणे

रंगभवन बागेत साकारणार भव्य शिवस्मारक

CD

PNE26W29646
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची प्रतिकृती.

रंगभवन बागेत साकारणार भव्य शिवस्मारक
इंद्रजित पवार यांची माहिती; तीनही बाजूंनी दिसण्यासाठी वाढविणार चौथरा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : शहरातील रंगभवन चौकाजवळील जिल्हा परिषद उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. जून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचे अंदाजपत्रकही लवकरच तयार करण्यात येणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली.
स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ फूट ६ इंच उंचीचा सुवर्णमुलामा असलेला ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार असून, स्मारकाची एकूण उंची सुमारे २२ फूट ६ इंच असेल. बांधकामासाठी अस्सल काळ्या पाषाणाचा वापर करण्यात येणार आहे. ऐतिहासिक वास्तुकलेची झलक देणारे वाडा पद्धतीचे प्रवेशद्वार, राजमुद्रा आणि आकर्षक सुशोभीकरणामुळे हे स्मारक शहराच्या वैभवात भर घालणार आहे. तसेच परिसराचे सुशोभीकरण करून चारही बाजूंनी शिवरायांचे भव्य आणि स्पष्ट दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

कोट...
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्यानाचे सुशोभीकरण व पुतळा असलेल्या चौथऱ्याची उंची वाढवण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली आहे. स्मारकाचे डिझाइन अंतिम झाले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, जून २०२७ पर्यंत उद्यानाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
- इंद्रजित पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT