पुणे

मंद्रुप तहसील अंतर्गत ''महाराजस्व समाधान शिबिर; महसूल प्रश्न आता एकाच छताखाली सुटणार

CD

मंद्रूप तहसील कार्यालयांतर्गत
महाराजस्व समाधान शिबिर
सकाळ वृत्तसेवा
मंद्रूप, ता. ३ : अपर तहसील कार्यालय, मंद्रूपच्या वतीने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान - टप्पा १’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मार्च महिन्यापासून झाला आहे.
महसूल व वनविभागाच्या १८ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार हे अभियान राबविले जात असून, नागरिकांना ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’च्या माध्यमातून एकाच दिवशी विविध सेवा उपलब्ध करून देणे व डिजिटल सेवांचा प्रभावी वापर सुनिश्चित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार ७ मार्च रोजी माळकवठे (निंबर्गी मंडल), १४ मार्च - मंद्रूप (मंद्रूप मंडल), १० एप्रिल - औराद (औराद मंडल), १७ एप्रिल - विंचूर (विंचूर मंडल), ८ मे - निंबर्गी (निंबर्गी मंडल), १५ मे - टाकळी (मंद्रूप मंडल) अशी सर्व शिबिरे सकाळी १० वाजता सुरू होतील.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारा वितरण, उत्पन्न, रहिवास, जात व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे, अकृषिक परवानगी व मार्गदर्शन, नव्या व्यवस्थेनुसार सनद वाटप, तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्त्यांची माहिती, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, घरकुलासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या संधीचा लाभ कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अपर तहसीलदार विष्णू बुटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT