छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या जगाचे हिरो - राज्यपाल  sakal
पुणे

छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या जगाचे हिरो - राज्यपाल

हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा वापर करीत त्रिवेणी संगम करून राज्य केले

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज एक अवतारी पुरुष होते. मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवचेतना निर्माण केली. जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे 'हिरो' आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (governer bhagtsinh koshyari) यांनी सिंहगड येथे काढले.

राज्यपालांनी सिंहगडास आज भेट दिली. नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका पढेर, सिंहगडचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, महावितरणचे मुळशीचे उपअभियंता फुलचंद फड, गोऱ्हे बुद्रुकचे सदस्य सुशांत खिरीड, भाजपचे अध्यक्ष सचिन मोरे, घेरा सिंहगडच्या तलाठी वर्षा आरमाळकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
राज्यपाल कोश्यारी यांना किल्ले सिंहगड व परिसराची माहिती सिंहगडचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते यांनी दिली. लोकमान्य टिळक यांच्या बंगल्यास राज्यपालांनी भेट दिली. तेथिल त्यांचे वास्तव्य आणि परिसराची माहिती आमदार मुक्ता टिळक यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज देशाचा स्वाभिमान व अभिमान आहे. त्यांच्या सारख्या इतर थोर राष्ट्र पुरुषांबद्दल लहान मुलांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सिंहगडावर स्थानिक रहिवाशी महिलांनी काढल्या होत्या. घेरा सिंहगडच्या माजी सदस्य सीमा पढेर यांनी त्यांच्या घरासमोर तिथे राज्यपाल जानाऱ्या रस्त्यावर रांगोळीने wel come असे लिहिले. त्यांनी राज्यपालांना औक्षण केले. त्यानंतर राज्यपाल त्याना म्हणाले कसे आहात तुम्ही, आमच्या उत्तराखंड मध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे.... असे म्हणत पुढे मार्गस्थ झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT