Prithviraj Jachak Sakal
पुणे

एफआरपीची थकीत रक्कम जमा करण्याची मागणी - पृथ्वीराज जाचक

छत्रपती सहकारी साखर कारखाने चालू गळीत हंगामामध्ये १० लाख ९५ हजार मेट्रीक टनाचे गाळप टप्पा पूर्ण केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती सहकारी साखर कारखाने चालू गळीत हंगामामध्ये १० लाख ९५ हजार मेट्रीक टनाचे गाळप टप्पा पूर्ण केला आहे.

वालचंदनगर - भवानीनगर (ता. इंदापुर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर (Chhatrapati Sugar Factory) कारखान्याच्या संचालक मंडळाने चालू हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीची (FRP) सुमारे ३१५ रुपये प्रतिटन प्रमाणे ३४ कोटी ६५ लाख रुपये व त्यावरील व्याजाची थकीत रक्कम (Arrears Amount) तातडीने देण्याची मागणी शेतकरी कृती समितीचे प्रमुख व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) यांनी केली आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखाने चालू गळीत हंगामामध्ये १० लाख ९५ हजार मेट्रीक टनाचे गाळप टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याने २५ मार्चपर्यंत गाळप केलेल्या उसाचे २२०० रुपये प्रतिटनाप्रमाणे सभासदांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. चालू वर्षीची एफआरपीची रक्कम सुमारे २५१५ असून उवर्रित सुमारे ३१५ रुपये प्रतिटन एफआरपीची रक्कम कारखान्याकडे शिल्लक आहे. ऊस दर नियंत्रण आदेश 1966 मधील कलम ३(३) च्या तुरतुदीनूसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात एफ. आर. पी संपूर्ण रक्कम उस उत्पादक सभासदांना देणे कारखान्यावरती बंधनकारक आहे.

वेळेमध्ये एफ.आर.पी रक्कम न दिल्यास कलम ३(३अ) नुसार विलंब कालावधीसाठी १५% व्याज आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियमामध्ये आज अखेरपर्यंत केंद्र सरकारने कोणताही बदल केला नाही. छत्रपती कारखान्याने चालू गळीत हंगामातील एफआरपीची ३१५ रुपये प्रतिटन थकीत रक्कमेचे ३४ कोटी ६५ लाख रुपये व त्यावरील व्याजाची सभासदांच्या खात्यावर जमा करावेत. कारखान्याने चालू वर्षी सुरवातीला गेटकेन ऊसाचे मोठ्या प्रमाणावर गाळप करण्यास प्राधान्य दिल्यामुळे सभासदाचा ऊस अद्यापही शेतामध्ये उभा असून ऊसाला तुरे आले असून एकरी १० ते १५ टन ऊसाचे नुकसान झाले असल्याचे जाचक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT