मत्स्यसंपदा योजनेसाठी
नाशिकमध्ये साह्यता कक्ष
२४ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : मत्स्य व्यवसायाला चालना देणे, मत्स्योत्पादनात वाढ करणे आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध २४ घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे.
राज्यातील उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून मत्स्य व्यवसायाचे आधुनिकीकरण व विस्तार करणे, मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे, मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे तसेच मत्स्य आहाराचा वापर वाढविणे, हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत. यामुळे मत्स्यपालक आणि मत्स्य व्यवसायिकांचे उत्पन्न वाढून त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तरात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना योजनेची माहिती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी कार्यालयातील किशन व. वाघमारे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी महाडीबीटी २.० पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यता कक्षाचे संपर्क अधिकारी किशन व. वाघमारे यांच्याशी ७९७२२४८८६३५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), नाशिक यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.