Pawar 
पुणे

अन्‌ पवारांच्या 'त्या' बॅनरने मुख्यमंत्र्यांचेही वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर ः आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भोर-वेल्हे तालुक्‍यातून सातारकडे रवाना झाली. यावेळी यात्रेच्या स्वागतासाठी भाजपने अनेक फ्लेक्‍स महामार्गावर लावले होते, त्यातील एक राष्ट्रवादी कॉग्रेसचा फ्लेक्‍स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. 

दरम्यान, यात्रा जाणाऱ्या ठिकाणी सर्वच नेते-कार्यकर्त्यांनी संपूर्ण महामार्गावर भाजप व महायुतीच्या वतीने जागोजाग त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी महामार्गावर भाजपच्या झेंड्यांसह 

मुख्यमंत्र्याच्या फोटो व स्वागताचे मोठे मोठे फ्लेक्‍स लागले होते. या फ्लेक्‍सच्या गर्दीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक फलक मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. केळवडे (ता. भोर) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेला हा फलक मुख्यमंत्र्यांना दिसेल, अशा पद्धतीने मोक्‍याच्या ठिकाणी लावण्यात आला होता. या फलकावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून होत असलेल्या नेत्यांच्या गळतीवर "कैसे छोड दु अकेला उनको, हराने के लिये सारि दुनिया एक हो गई है...! असे मार्मिक भाष्य करून भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच पुढे साहेब आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत असा निर्धारही व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी केळवडे असा फलकाच्या खाली उल्लेख असून, कोणत्याही कार्यकर्त्यांचे नाव व फोटो या फलकावर नव्हता. मुख्यमंत्री ताफ्यातील सर्वांचेच हा फलक लक्ष वेधून घेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT