माधव भंडारी 
पुणे

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री दाखवणार का?

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

पुणे: महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संविधान वाचवा, असे म्हणत आहेत. त्यामुळे संविधानाचा मान ठेवून नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून निलंबित केले पाहिजे. मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून उद्धव ठाकरे ठाकरी बाणा दाखवणार का? असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी गुरुवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत केला.

भंडारी म्हणाले, ‘‘सरकारी अधिकाऱ्याला लागू असलेले भत्ते मंत्र्यांना देखील मिळतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना लागू असलेले नियम देखील मंत्र्यांना लागू झाले पाहिजे. मलिक यांना पाठिंबा देणे म्हणजे नागरिकांची चेष्टा केल्यासारखे आहे. दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल.

मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली :

मुख्यमंत्री ठाकरे यांनी याआधी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलिस अधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली, असा आरोप भंडारी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

Afghanistan–Pakistan War: अफगाण-पाक संघर्षाने घेतलं भीषण रूप! 15 चौक्या ताब्यात, 55 सैनिक ठार, सीमेवर रक्तरंजित संग्राम…

Video: ‘इंद्रकुमार, मला का घेतलं नाही?’'धमाल 4'बद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले...'अजयने मना किया क्या?'

Latest Marathi News Live Update : राज्यात विविध कार्यक्रमांसह आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

SCROLL FOR NEXT