Chief Minister uddhav thackeray doesnt know anything about agriculture said Chandrakant Patil 
पुणे

''मुख्यमंत्र्यांना शेतीतील काही कळत नाही'' : चंद्रकांत पाटील

रमेश वत्रे

केडगाव(पुणे) : ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्ची टिकवण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहेत. त्यांना सेस, एफआरपी, हेक्टर हे काही कळत नाही पण खुर्ची टिकवणे कळते. त्यांना कोण सल्ला देते समजत नाही'' अशी टीका भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►
 क्लिक करा 

भारतीय जनता पक्षाने बळीराजा सन्मान व ट्रॅक्टर पूजनच्या राज्यव्यापी रॅलीचा समारोप चौफुला ( दौंड ) येथे करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व बाळा भेगडे,  किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. अनिल बोंडे, आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नामदेव बारवकर, सुरेश शेळके, दादा केसकर, ज्ञानदेव शेळके, मनोज फडतरे, सुभाष डाबी, मल्हारी गडधे, बाळासाहेब तोंडे पाटील, शामराव ताकवणे, संतोष भोसले उपस्थित होते. किसान मोर्चाचे वासुदेव काळे यांनी रॅलीचे आयोजन केले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे यांनी स्वागत केले. अंकुश शेंडगे व अंकिता बारवकर या शेतकऱ्याच्या सन्मान करण्यात आला. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे कायदे केल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी ही रॅली आहे. शेतकऱ्यांना जादा पैसे मिळावेत असे विरोधकांना वाटत नाही. या कायद्यामुळे दलाल, ठेकेदार, व्यापारी यांची गोची झाली आहे आणि त्यांचे नेतृत्व काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष करीत आहेत. राज्याने या कृषी विधेयकाला स्थगिती दिली आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयात ही स्थगिती टिकणार नाही. ''

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी

''केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही. असा कायदा केला आहे. मात्र बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायला मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे.'' असेही पाटील म्हणाले

माजी मंत्री अनिल बोंडे म्हणाले, ''कृषी कायद्यामुळे दलालांची अडचण झाली आहे. शेतकऱ्यांना कायदा समजला पण या गाढवांना कायदा कळेना. काँग्रेसने हे कृषी विधेयक आणू असे २०१९ मधील निवडणूक जाहिरनाम्यात नमूद केलेले आहे.''

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''केंद्राने केलेल्या कायद्यांना राज्याला स्थगिती देता येत नाही. कृषी कायद्याने शेतकऱ्यांचे भले होणार आहे. मात्र विरोधासाठी विरोध केला जात आहे.'' 

जंबो कोविड सेंटरमधील तंबू अग्निरोधक 

राहुल कुल यांनी अष्टविनायक मार्ग, बेबी कालवा, भामा आसखेड, कालव्याचे आवर्तन, वीज कामाबाबत माहिती देत कृषी विधेयकाचे समर्थन केले. वासुदेव काळे यांनी प्रास्ताविक  केले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT