Chief Minister Vayoshree Yojana sakal
पुणे

Chief Minister Vayoshree Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, एकरकमी मिळणार आर्थिक साह्य; असा करा अर्ज

शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकरकमी आर्थिक साह्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकरकमी आर्थिक साह्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. यात पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी ३ हजार रुपये थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येतील.

लाभ वितरण झाल्यावर या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे लागणार आहे.

अधिक माहितीसाठी पात्र अर्जदारांनी समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ ईमेल-acswopune@gmail.com) वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT